17 नोव्हेंबर 2018 ला सकाळी 7 वाजता निगायचे ठरलं,ठीकाण होते किल्ले "तुंग"(कठीण गड).
तुंग किल्ल्याच्या कठीणगड नावावरून असेच वाटेल की किल्ला चढायला कठीण आहे परंतु किल्ला चढण्यास कठीण नाही. पवन मावळ प्रांतातील तुंग किल्ला हा एक घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. तुंग किल्ल्याची उंची जास्त असल्यामुळे पूर्वी बोरघाटमार्गे चालणाऱ्या वाहतुकीवर आणि लोहगड, विसापूर, तिकोना, कोराईगड या किल्ल्यांवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे.
इतिहास
तुंग किल्ल्याला तशी वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली नाही. मात्र १६५७ मध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसमवेत हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला. सन १६६० मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली होती. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखानाने आपल्या स्वारीच्या वेळी ६ मे १६६५ रोजी तुंग आणि तिकोना या भागातील अनेक गावे जाळली, पण हे किल्ले मात्र ते जिंकू शकले नाहीत. ११ जून १६६५ रोजी झालेल्या पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तुंग हा हि एक किल्ला होता. पुरंदर तहानुसार १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला.
आजच्या सफरी साठी पंकज,सागर,सुमित आणि मी (आशिष) सज्ज होतो, व्हाट्सएपच्या ग्रुप वर सकाळी निघायचा मेसेज केला तर निलेश ने रिप्लाय केला,की तो सुद्धा येण्यास तयार आहे,मग आम्ही 5 जण 3 गाड्या घेऊन निघालो,आणि नेहमी प्रमाणे 7 चे 7.45 झाले.
हायवे ला बेलदारे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून आम्ही चांदणी चौकाकडे निघालो,आम्हाला पिरंगुट-पौड-जावन-तुंगवाडी मार्गे तुंग किल्ला गाठायचे होते.
पिरंगुट मध्ये आम्ही सर्वानी मिसळ,ताक,वडापाव असा दमदार नाष्टा केला आणि वडापाव पुढील प्रवासा साठी पार्सल घेतले .
साधारण 11 वाजण्याच्या सुमारास आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचलो.
गड चढाईला आम्ही सुरवात केली,गड तसा सोपा आहे,अधून मधून खडी चढाई आहेत,पण आजूबाजूला असलेला निसर्ग बगून आपला थकवा नाहीसा होतो .
चढाई दरम्यानच्या काही खड्या वाटा
कातळात कोरलेल्या पाय वाटा घाम काढल्या वाचून राहत नाहीत.
किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार अजून सुस्थितीत आहे,दरवाजाची मांडणी आणि सोबत जोडून असलेली तटबंदी बघण्या जोग आहे.
मुख्य दरवाजा पासून पुढे आल्यावर पुन्हा एकदा चढाई करून आपण आजून एक दरवाज्या जवळ येतो,सध्या हा दरवाजा शिवप्रेमीनी बसवलेला आहे.
बालेकिल्ला चढताना भूक लागल्यामुळे आम्ही वडापाव चा नाष्टा केला आणि आमच्या समोर होता पवना जलाशय व सह्याद्री वर्णन हे शब्दात करता येण्यासारखे नाही
अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला आपला "सह्याद्री".
बालेकिल्यावरील मंदिराची डागडुजी करण्यात आली आहे,तुंगाई देवीचं हे मंदिर आहे.
पवना जलाशय आणि तिकोना किल्याचे दर्शन अप्रतिम आहे.

संपूर्ण गड बगून झाला गड उतरायला घेतला तर आठवले की गडावर एक मोठी गुहा आहे.ती अजून आमच्या नजरेस आली न्हवती, आम्ही सर्व जण मिळून त्या गुहेचा शोध सुरू केला आणि ती शोधून काढली.
ही गुहा पाण्याची आहे,भली मोठी बांधणी आहे,या गुहेचे दोन भाग पडतात,कदाचित एक भाग राहण्यासाठी अन दुसरा पाणी साठवणी साठी.
तुंग किल्ल्यावर येऊन जर ही गुहा नाही बघितली तर तुम्ही इतिहासातील उत्तम इंजिनिअरिंग चं उदाहरण गमून बसाल.
गुहेच्या बाहेरील फोटो सेशन
सुमित भाऊ
सागर शेठ
सर्वानी गाड्या काढल्या आणि लोणावळ्याच्या दिशेने रवान्या झाल्या.
दिवस भर आगी सारखा तेवत असलेला सूर्य परतीच्या वेळी मात्र शितल होऊन आम्हा सर्वांना निरोप देत होता.
तुंग किल्ल्याच्या कठीणगड नावावरून असेच वाटेल की किल्ला चढायला कठीण आहे परंतु किल्ला चढण्यास कठीण नाही. पवन मावळ प्रांतातील तुंग किल्ला हा एक घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. तुंग किल्ल्याची उंची जास्त असल्यामुळे पूर्वी बोरघाटमार्गे चालणाऱ्या वाहतुकीवर आणि लोहगड, विसापूर, तिकोना, कोराईगड या किल्ल्यांवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे.
इतिहास
तुंग किल्ल्याला तशी वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली नाही. मात्र १६५७ मध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसमवेत हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला. सन १६६० मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली होती. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखानाने आपल्या स्वारीच्या वेळी ६ मे १६६५ रोजी तुंग आणि तिकोना या भागातील अनेक गावे जाळली, पण हे किल्ले मात्र ते जिंकू शकले नाहीत. ११ जून १६६५ रोजी झालेल्या पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तुंग हा हि एक किल्ला होता. पुरंदर तहानुसार १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला.
हायवे ला बेलदारे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून आम्ही चांदणी चौकाकडे निघालो,आम्हाला पिरंगुट-पौड-जावन-तुंगवाडी मार्गे तुंग किल्ला गाठायचे होते.
साधारण 11 वाजण्याच्या सुमारास आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचलो.
गड चढाईला आम्ही सुरवात केली,गड तसा सोपा आहे,अधून मधून खडी चढाई आहेत,पण आजूबाजूला असलेला निसर्ग बगून आपला थकवा नाहीसा होतो .
कातळात कोरलेल्या पाय वाटा घाम काढल्या वाचून राहत नाहीत.
किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार अजून सुस्थितीत आहे,दरवाजाची मांडणी आणि सोबत जोडून असलेली तटबंदी बघण्या जोग आहे.
मुख्य दरवाजा पासून पुढे आल्यावर पुन्हा एकदा चढाई करून आपण आजून एक दरवाज्या जवळ येतो,सध्या हा दरवाजा शिवप्रेमीनी बसवलेला आहे.
दरवाजा अजून ऐटीत आहे,असे वाटते की आपल्या स्वागतासाठी खडा आहे.
1.30 ते 2 तासाची चढाई करुन, आम्ही गडावर पोहचलो,गड पाहण्यास आम्ही सुरवात केली ते गणपती बाप्पाच्या दर्शनाने.
मंदिरा मध्ये दगडी श्री गणेश मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे.शेजारीच पाण्याचं टाक आहे,या टाक्यांची रचना आयता कृती आहे,टाक्यात उतरण्यासाठी दगडी पायऱ्या सुद्धा आहेत.
मंदिर आणि टाके हे जवळ जवळ आहेत,असे वाटते की जेव्हा कुणी गडावर आले की टाक्यातील पाण्यानी आपले चरण स्वछ करून श्री गणेशाचे दर्शन घेऊन पुढे तो इसम बालेकिल्ल्यावर जात असे.
आम्ही सुद्धा दर्शन घेऊन बालेकिल्ल्याकडे प्रस्थान केले,तर वाटेत आम्हाला पाण्याच्या टाक्याकडे जाण्याचा मार्ग दिसला.
हे दोन्ही टाके कातळा मध्ये कोरून तयार केलेले आहे,12 ही महिने या टाक्यात पाण्याचा साठा असतो आणि पाणी हे पिण्यासाठी उत्तम आहे,गड बघताना चालून,उन्हानी जो क्षीण आला होता तो या कातळातील थंडगार पाण्याने लगेच नाहीसा होतो.
आता पुढे आम्ही बालेकिल्ला कडे निघालो.
अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला आपला "सह्याद्री".
नाष्टा झाल्यावर आम्ही नॉनस्टॉप बालेकिल्ला गाठलं.
बालेकिल्यावरील मंदिराची डागडुजी करण्यात आली आहे,तुंगाई देवीचं हे मंदिर आहे.
सागर भाऊ दर्शन घेतानी छायाचित्र.
बालेकिल्ला खूप असा मोठा नाही या किल्ल्यावर , सभोवतालच्या प्रदेश व घाटावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत.
तुंग वरून दिसणारे मोरगिरी किल्ल्याचे दृश्य.
गडा वरील मित्रांच्या कॅमेऱ्यात कैद केलेल्या काही आठवणी.
गुहेकडे जाणारा व परतीचा मार्ग.
तुंग किल्ल्यावर येऊन जर ही गुहा नाही बघितली तर तुम्ही इतिहासातील उत्तम इंजिनिअरिंग चं उदाहरण गमून बसाल.
गुहेच्या बाहेरील फोटो सेशन
सुमित भाऊ
सागर शेठ
फोटो सेशन झाल्यावर आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहचलो, जरा वेळ तिथेच बसून गडा बद्दल अनुभवलेलं क्षण व माहितीची देवाण घेवाण केली.
दुपारचे 3.45 झाले होते,ठरलेल्या वेळे पेक्षा गड लवकर फिरून झाला.मग पुढे काय चला लोणावळ्याला सूर्यास्त बघण्यासाठी निघालो.सर्वानी गाड्या काढल्या आणि लोणावळ्याच्या दिशेने रवान्या झाल्या.
तासाभरात आम्ही शिवलिंग पॉईंट ला पोहचलो,बगतो तर सर्वी कडे भरपूर गर्दी, मग एक जागा मोकळी मिळाली आणि तिथेच आम्ही सूर्य मावळायची वाट पाहू लागलो.
मी आणि निलेश भाऊ.दिवस भर आगी सारखा तेवत असलेला सूर्य परतीच्या वेळी मात्र शितल होऊन आम्हा सर्वांना निरोप देत होता.
लोणावळ्यातील आम्हा मित्रांची एक सेल्फी.
सूर्या सोबत दिवस मावळला आता परतीच्या प्रवासाला आम्ही लागलो,हायवेला पंजाबी ढाब्यावर आम्ही मनसोक्त जेवण केले.आणि निरोप घेतला की लवकरच पुढच्या ट्रेक ला भेटुयात तोपर्यंत राम राम मंडळी.....
।।।।धन्यवाद।।।।।

No comments:
Post a Comment